औषधांचे वाटप करण्यापूर्वी गंभीर यांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेतला होता काय? : उच्च न्यायालय

49

गौतम गंभीर यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा असल्याने त्यावरही कोर्टाने आश्‍चर्य व्यक्त केलं आहे. या आधी दिल्ली सरकारच्या वकिलाने कोर्टात याबाबतची माहिती दिली होती. 

कोरोनाचे औषध वाटप करायला गौतम गंभीर यांच्याकडे लायसन्स आहे काय?, औषधांचे वाटप करण्यापूर्वी गंभीर यांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेतला होता काय? असा सवाल कोर्टाने केला आहे.

लोकांना फॅबीफ्ल्यू औषध मिळत नसताना एक नेता सर्रासपणे फॅबीफ्ल्यू औषधांचं मोफत वाटप करत आहे, असे या वकिलाने म्हटले होते. त्यावर हे काम चांगले आहे. पण पद्धत चांगली नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

त्यावेळी कोर्टाने हा सवाल केला की लायसन्स नसताना कोणत्याही व्यक्तिला औषधांचे वाटप करण्याची परवानगी कशी मिळू शकते.