नंदीग्राम येथे दुखापत झाल्यानंतर ममता बॅनर्जी भाजप वर आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी मुत्सद्देगिरीने भाष्य केले. ते म्हणाले की, दीदी जखमी झाल्या तेव्हा त्या बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना केली, पण त्या निराशेतून सारा राग माझ्यावर काढत आहे.
तृणमूलने आदिवासींना कधीही आपले मानले नाही. आदिवासींना ते केंद्राच्या लाभकारी योजनांपासून वंचित ठेवतात. तोलाबाजीमुळे (दलाली) सर्वाधिक फटका आदिवासींना बसला. घर, स्वस्त दराने तांदूळ अशा योजना गरजूंपर्यंत पोचल्या नाहीत.
भाजप म्हणते शिक्षण; दीदी म्हणतात खेला होबे, महिलांची प्रगती; दीदी म्हणतात खेला होबे, भाजप म्हणते पक्की घरे, प्रत्येक घरात नळ अन्् पिण्याचे स्वच्छ पाणी, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांच्या सामना होणार या घोषणेचा संदर्भ देत उलटवार केले.
लक्षणीय संख्येने गर्दी केलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रामुख्याने आदिवासींची समावेश होता. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनी अनेक वेळा बंगाली शब्दप्रयोगांचा वापर केला.