पुणे पोलिसांनी covid19-mhpolice-in ची वेबसाईट तयार केली असून याद्वारे हे डिजिटल पास देण्यात येणार आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात यासाठी डिजिटल पास कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष 24 तास सेवा देणार आहे.
कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही. विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवास करण्यासाठी डिजिटल पास देण्यात येणार आहे.
नागरिकांना आवश्यक ती कागदपत्र ऑनलाइन द्यावी लागणार आहेत. लग्नसमारंभासाठी वधू वर त्यांचे आई-वडील भाऊ-बहीण काका, आत्या, मावशी अशांनाच हे पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी लग्नपत्रिका सोबत जोडणे आवश्यक आहे.
राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक कारण असेल तरच पुण्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.