दिलीप मोहिते पाटलांची शिवाजीराव पाटलांवर जोरदार टीका

61

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार मोहितेंवर टीका केली होती. त्याबाबत रविवारी पत्रकार परिषद घेऊन मोहिते यांनी प्रत्युत्तर दिले आहे .

शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेची निवडणूक हरले आहेत; पुढेही त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळणार नाही, म्हणून ते नैराश्यग्रस्त झाले आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी निमित्त पाहिजे, म्हणून ते खेड पंचायत समितीच्या इमारतीचा विषय घेऊन नौटंकी करीत आहेत आणि जाणीवपूर्वक गरळ ओकत आहेत,” अशी टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अरुण चांभारे आदी उपस्थित होते.

खेड तालुक्याच्या विकासाला विरोध करण्याचे धोरण आढळरावांचे राहिले असून त्यांच्यामुळे विमानतळ, एसईझेड असे मोठे प्रकल्प झाले नाहीत. परिणामी तालुका विकासात मागे राहिला आहे.”असेही मोहिते म्हणाले .

खेड तालुक्याचा विकास म्हटले की, आढळरावांचा विरोध ठरलेला आहे. तालुक्याच्या विकासात यांचे काहीही योगदान नाही, मग विरोधाला कसे पुढे येता? आढळरावांची तक्रार त्यांच्या पक्षच्या वरिष्ठांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.