आंदोलन शेतकऱ्यांसाठी दिलजीतची एक कोटींची मदत

10

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज सिंधू याने थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपयांची रक्कम दान केली आहे. ही रक्कम त्याने थंडीपासून बचाव मिळावा म्हणून स्वेटर आणि चादर खरेदी करण्यासाठी दिली आहे. सोशल मीडियावर पंजाबी गायक सिंघा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत दिलजीतने एक कोटी रुपये दान केल्याची माहिती दिली आहे.

शेतकरी आंदोलनावरून नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि दिलजीत दिसांज या दोघांमध्ये ट्विटरवर शाब्दिक वाद झाला. कंगणाने आंदोलनकर्त्या एका वृद्ध महिलेविषयी आक्षेपार्ह ट्विट केले होते. शेतकर्यांना पाठिंबा देण्याकरिता शनिवारी दिलजीत बॉर्डरवर पाहोचला होता. तेव्हा त्याने प्लिज शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या एवढीच आमची मागणी आहे अशी विनंती केली आहे.

माझा सर्व शेतकऱ्यांना सलाम आहे. शेतकऱ्यांनी नवीन इतिहास रचला आहे. हा इतिहास येणाऱ्या पिढीला सांगितला जाईल. शेतकरी येथे शांततेत आंदोलन करत आहेत. शेकऱ्यांच्या अडचणी कोणीही वाढवू शकत नसल्याचे ही दिलजीत म्हणाला आहे. पंजाबी गायक सिंघा यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. तसेच आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दलही दिलजितचे आभारही व्यक्त केले आहेत.