औरंगाबाद शहरात वाढत असलेली कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. ते तुमच्या आमच्या सर्वांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. असे प्रतिपादन औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.
असे असूनही काल संभाजीनगरमध्ये निर्बंध असताना एका मुस्लिम बांधवाने सलून उघडं ठेवलं होतं. साहजिकच पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी त्याला बंद करायला सांगितलं. त्याला समजावून सांगत असतानाच सलूनचालकाला चक्कर येऊन जागेवरच कोसळून मृत्यू झाला. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर जातीचं राजकारण करत सलून चालकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्य झालाय असा खोटा आरोप करत पोलीस खात्याला विनाकारण बदनाम करायला सुरू केलं. पुढे cctv फुटेजमधून सत्य बाहेर आलंच आहे ते आपण सर्वजण पाहू शकता.
जलील यांनी जमावबंदीचा आदेश असताना जमाव गोळा केला, प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जर लोकप्रतिनिधीच असे नियम झुगारून सामान्य जनतेचं आरोग्य धोक्यात आणत असतील आणि याची वारंवार पुनरावृत्ती होत असेल तर याला जनतेनेच उत्तर द्यायला हवं असही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.