ऊ.प्रदेश आणि बिहारमध्ये गंगेच्या किनारी आढळलेल्या मृतदेहांची देशभर चर्चा झाली. महाराष्ट्रात तर त्यावरुन केंद्र सरकारवर टीकासुद्धा करण्यात आली. मात्र त्याचवेळी बीडमध्ये एकाच व्हॅनमध्ये कोंबून विटंबना केले गेलेल्या त्या २२ मृतदेहांचे काय? असा सवाल माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दै. लोकसत्ताच्या “दृष्टी आणि कोन” या कार्यक्रमात ते बोलत होते. गंगेच्या किनारी असलेल्या मृतदेहांची तुलना त्यांनी बीडमधल्या मृतदेहांशी केली आहे. तसेच कोरोना परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी पडल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले.
राज्य सरकारने एक प्रचारकी संस्था ऊभारली आहे. ज्यास ईकोसिस्टीम असे म्हणतात. या ईकोसिस्टीमद्वारे महत्वांच्या मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्यासाठी रोज सकाळी एखादी माहिती वा बातमी पेरते आणि मग दिवसभर तेच चालवते. गंगेच्या किनारी मृतदेह पडले होते हे चुकीचेच आहे. म्हणून त्याची चार-चार दिवस चर्चा आणि मग बीडमध्ये झाले ते काय होते? त्या २२ मृतदेहांची वीटंबना झाली त्याबद्दल ब्रसुद्धा काढला गेला नाही.
महाराष्ट्रात मृतांच्या आकड्यांमध्ये लपवाछपवी होत आहे. सर्व धळधळ दिसत असतांनासुद्धा सरकारला प्रश्न केला तर मी सत्तेकडे जात असल्याचा मुद्धा ऊद्भवतोच कुठे? अशा विविध विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताशी संवाद साधला.