संयोग प्रतिष्ठानच्या वतीने मोफत औषध आणि मास्कचे वाटप

37

परभणी : संयोग प्रतिष्ठाण सेलू यांच्या वतीने कोवीड 19 या महामारी पासून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आयुवेर्दिक औषध व मास्कचे मोफत वाटप सेलुतील शारदा विद्यालयात करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित शाळेतील मुख्याध्यापक श्री डी. डी शिंदे व बी. आर. साखरे यांच्या कडे मास्क व औषध सुपुर्द करण्यात आले.

देशात वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता, शालेय विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून संयोग प्रतिष्ठान सेलू यांच्या वतीने विविध शाळेत मास्क, तसेच आयुर्वेदिक औषधे यांचे मोफत वाटप केले जात आहे. त्याबद्दल संयोग प्रतिष्ठानचे सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी वसंत शेरे, विनोद शेरे सर, रोहित क्षीरसागर, मोहित कांचन, आदित्य राऊत, सुदेश वटाणे , गोपाल लाटणे, रोहित शेरे, इत्यादी संयोग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. सदरील कार्यक्रम मोहकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.