वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. संसर्गावर नियंत्रण मिळवण्याकरीता प्रभावी लसीकरण हा एकमेव ऊपाय आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमिवरच मालेगाव तालुक्यातील लसीकरण केंद्रावर जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी स्वत: भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
लसीकरणाच्या तीसर्या टप्प्यास जिल्हाभरात सुरुवात झाली आहे. यामध्ये ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येत आहे. मात्र अजूनही लसीकरणाबाबत समाजात काही गैरसमज अाहे. परिणामी लोक लस घेण्यात दिरंगाई करत आहे. अशांतच जिल्हाधिकार्यांनी स्वत: लसीकरण केंद्रास भेट देऊन लसीकरणाचे आवाहन केले आहे.
मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रतिबंधीत क्षेत्रांससुद्धा जिल्हाधिकार्यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मालेगावचे तहसिलदार रवी काळे, गटविकास अधिकारी श्री. पद्मावर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांची ऊपस्थिती होती.
जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी यावेळी लसीकरणावर विशेष भर देण्याच्या सुचना स्थानिक प्रशासनास केल्या.