परभणी जिल्ह्यातील गांगेखेड येथे मास्क लावण्याच्या कारणावरून दिव्यांग कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण करणाऱ्या तलाठ्यास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी निलंबित केलं आहे.
तालुका आरोग्य कार्यालयामध्ये दि. २८ मार्च रोजी आरोग्य सहाय्यक भारत नरवाडे यांना डॉ. शिंदे यांचे पती तलाठी गजानन शिंदे व त्याच्या खासगी चालकाने मास्क लावण्याच्या कारणावरून दिव्यांग आरोग्य साह्यकाच्या हातातील काठी घेऊन तलाठी शिंदे याने व त्याच्या खाजगी चालकाने मारहाण केली होती.
अँटिजन कीट घेण्यासाठी हे दोघे आरोग्य कार्यालयात आले होते. त्यावेळी मास्क घाला, असे कर्मचाऱ्याने तलाठी शइंदे यांना म्हटले होते. त्याचाच मनात राग धरून शिंदे व त्याच्या चालकाने नलावडे यांना मारहाण केली.
आरोग्य सहाय्यक नलावडे यांच्या तक्रारीवरून शिंदे व त्याच्या खाजगी चालकाविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. तलाठी शिंदे यास शासकीय कामात अडथळा निर्माण करत कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी सेवेतुन निलंबित केल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुधिर पाटील यांनी शुक्रवारी काढले आहेत.