अशा पद्धतीने घरीचं करा, मेनिक्युअर आणि पेडिक्युअर

55

मेनिक्युअर:

साहित्य:- पॉट, शॅम्पू, कोमट पाणी, हायड्रोजन पॅरॉक्साईड(मेनिक्युअर साठी 2,3 थेंब), क्युटिकल क्रिम, मसाज क्रिम, बेबी ब्रश, बफर, नेलफायलर, नेलकटर, स्क्रब

कृती:- १)  प्रथम एक स्वच्छ पॉट घेणे. त्या पॉटमध्ये कोमट पाणी, शॅम्पू, 2 ते 3 थेंब हायड्रोजन पॅरॉक्साईड टाकणे.
२) नखांना नेलपेंट लावले असेल तर ते रिमूव्हरने काढून घेणे. नखे वाढली असतील तर कापून घेणे. नखांना नेलफायलरने व्यवस्थित शेफ देणे.
३) नखांना क्युटिकल क्रिम लावून बोटे १० ते १५ मी. पाण्यात भिजवणे. नंतर नखांवरचे क्युटिकल पुश करून पुसून घेणे. टोकदार स्टिकने नखांमधील घाण काढून घेणे.
४) हाताला स्क्रब करणे. ( गरज असल्यास)
५) यानंतर मसाज क्रीमने खांद्यापासून हाताच्या बोटांमध्ये गोलाकार बोटे फिरवत मसाज करणे.
६) नंतर हात स्वच्छ धुवून घेणे, बेबी ब्रशने नखे घासून घेणे. नखे आणि हात स्वच्छ कापडाने पुसून घेणे.
७) नंतर बफरने नखांना पॉलिश करून घेणे. शेवटी आपल्याला हवी ती नेलपेंट नखांना लावणे.

पेडीक्युअर:

साहित्य:- पॉट, सॉल्ट, शॅम्पू, कोमट पाणी, हायड्रोजन पॅरॉक्साईड (पेडिक्युअर साठी 3,4 थेंब), मसाज क्रिम, नेलफायलर, बफर, बेबी ब्रश, क्युटिकल क्रिम, नेलकटर, स्क्रब

कृती:– १) प्रथम एक स्वच्छ पॉट घेणे, त्या पॉटमध्ये कोमट पाणी, सॉल्ट, शॅम्पू, हायड्रोजन पॅरॉक्साईड टाकणे.
२) नखांना नेलपेंट असेल तर ते रिमव्हूवरने काढून घेणे. नखे वाढले असतील तर कापून घेणे. नखांना नेलफायलरने व्यवस्थित शेफ देणे.
३) नखांना क्युटिकल क्रिम लावून पाय पॉटमध्ये २० ते २५ मी. भिजत ठेवणे. नंतर नखांवरचे क्युटिकल पुश करून पुसून घेणे. टोकदार स्टिकने नखांमधील घाण काढून घेणे.
४) हाताला स्क्रब करणे. ( गरज असल्यास)
५) नंतर गुडघ्यापासून पायांच्या बोटापर्यंत मसाज क्रीमने मसाज करणे. नखांमध्ये घाण असेल तर त्यावर 2,3 थेंब HP टाकणे.
६) पॉट मधील पाणी ओतून त्यामध्ये थंड पाणी घेणे. पॉटमध्ये पाय ठेवून बेबी ब्रशने तळवे आणि नखे घासून घ्यावे. या ब्रशने टाचा घासून घेणे. यांनंतर पाय स्वच्छ कापडाने पुसून घेणे.
७) नखांना बफरने पॉलिश करून घेणे, शेवटी आपल्याला हवी ती नेलपेंट नखांना लावणे.