कोरोना पार्श्वभूमीवर जालना येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटरमध्ये वाढ करण्याबरोबरच बेडच्या क्षमतेमध्ये वाढ करणे, यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
लसीकरणाच्या मोहिमेला अधिक गती देणे, खासगी दवाखान्यात रुग्णांना उपचारापोटी आकारण्यात येणारी देयके काटेकोरपणे तपासणे,ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, रेमेडिसेंविर इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांनी आणून देण्याची सक्ती होणार नाही याची दक्षता घेणे बाबत प्रशासनास त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख,अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अतिरित्क पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख,
जिल्हा शल्यचित्किसक डाॅ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ,जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर,नगर परिषदचे मुख्यकार्य कारी अधिकारी नार्वेकर,डाॅ संतोष कडले, डाॅ. संजय जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.