‘हे’ काम करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून तुमचे रेशन होईल बंद

164

रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्यांना आता आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थींचे आधार आणि मोबाईल क्रमांक 100 टक्‍के जोडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. रेशनकार्डधारकांनी 31 जानेवारीपर्यंत रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करून घेणे बंधनकारक असून, आधार लिंक न केल्यास लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून धान्य मिळणार नाही, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.

जर रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक केला नाही तर 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद करण्यात येणार आहे.  पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे एकूण १३ लाख ३२ हजार ८७१ एवढे लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत १0 लाख ६१ हजार ८२२ (७९.६६) टक्के इतक्या लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग पूर्ण झाले आहे. अद्याप ही सुमारे तीन लाखपेक्षा अधिक लाभार्थीचे आधार लिंकिंग पूर्ण झालेले नाही.

याबाबत आधार लिंकीग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करणेत आलेली असुन 31 जानेवारी 2021 पूर्वी या लाभाध्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक लिंकीग करण्याचे निर्देश 11 परिमंडळ कार्यालयांना देणेत आलेले आहेत. परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत रास्त भाव दुकानदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.