तुम्हाला गर्लफ्रेंण्ड आहे का? राहुल गांधींना केला थेट सवाल, यावर काय म्हणाले राहुल ……

37

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या केरळ आणि पड्डुचेरी दौर्‍यावर आहेत. राहुल गांधी हे दौर्‍यांदरम्यान राजकीय सभांशिवाय वास्ती-पाडे, शाळा अशाठिकाणीनीसुद्धा भेट देत असतात. त्याप्रमाणेच पड्डुचेरीतील एका शाळेत भेट देत त्यांनी लहाण मुलांशी संवाद साधला. यावेळी एका मुलीने तुम्हाला गर्लफ्रेंण्ड आहे का? असा सवाल थेट राहुल गांधी यांना केला. यानंतर मात्र सर्वत्र हश्याचे वातावरण झाले होते.

राहुल गांधींनी यावेळी आपल्या वेगळ्या रुपात या मुलांशी संवाद साधला. संवादादरम्यान त्यांनी मुलांना विविध प्रश्न केले. मुलांनीसुद्धा मनमोकळेपनाने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती चालवली. राहुल गांधी यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. मात्र अद्याप त्यांनी लग्न केलेले नाही. त्यांच्या लग्न करण्यावरुन विरोधक कायम त्यांच्यावर टीकासुद्धा करत असतात. सलमान खान प्रमाणेच राहुल गांधी यांचे लग्न कधी होणार अनेकदा हा चर्चेचा विषयसुद्धा होत असतो.

या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी एका साधरण मनुष्याच्या वेशात होते. संबंद्धित मुलीने प्रश्न विचारला असता, राहुल गांधीना “सर” असे ऊल्लेखिले. मात्र राहुल गांधी यांनी यावर “माझे नाव सर नसून राहुल आहे.” असे ऊत्तर दिले. त्यानंतर लगेच त्या मुलीने तुम्हाला गर्लफ्रेंण्ड आहे का? असा सवाल केला. यावर हसत राहुल गांधी यांनी “एखाद्या वेगळ्या दिवशी मी याचे ऊत्तर देईन” असे म्हणाले.

यावेळी मुलांनी राहुल गांधींना विविध प्रश्न विचारले. तुमचे मित्र र‍ाजकारणाव्यतीरीक्त ईतरही क्षेत्रात आहेत का? असतील तर मग कुठल्या पदांवर आहे? सध्या ते काय करतायत? असे अनेक प्रश्न विचारले. राहुल गांधींनीसुद्धा मनमोकळेपणाने यावर ऊत्तरे दिलीत.