केंद्रिय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने देशातील काही शहरांचे सर्वेक्षण करण्यात येते. यामध्ये जिवनसुलभता आणि महापालिकांची कामगिरी अशा विविध निकषांच्याआधारे राहण्यासाठी योग्य असणार्या शहरांना क्रमांक दिला जातो. भारतातील राहण्याकरिता सर्वोक्तृष्ट शहरांमध्ये या सर्वेक्षणांत दुसरा क्रमांक मिळाला आहे. नुकताच केलेल्या सर्वेक्षणाचा निर्देशांक मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आला आहे. आणि त्यामध्ये वास्तव्यासाठी अतिशय योग्य आणि ऊत्तम शहरांमध्ये पुण्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे तर बॅंगलोरने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे.
यंदाच्या सर्वेक्षणात एकुण १११ शहरांचा समावेश करण्यात आला होता. जीवनसुलभतेच्या दृष्टीने त्या-त्या शहरांतील वास्तव्याची सुविधा, शिक्षण, आरोग्य, दैनंदिन व्यवस्था, अर्थव्यवस्था, सुरक्षितता आदी १३ निकष तपासण्यात आले. त्यानंतर राहण्यासाठी सर्वाधिक योग्य शहर कोणते हे ठरवण्यात आले. यामध्ये मोठ्या शहरांमध्ये(ज्यांची लोकसंख्या १० लाखापेक्षा अधिक आहे.) बॅंगलोरने पहिला मान मिळवला आहे, तर छोट्या शहरांमध्ये( ज्यांची लोकसंख्या १० लाखांपेक्षा कमी आहे.) सिमलाने पहिला क्रमांक मिळवला आहे. मोठ्या लोकसंख्यांच्या शहरांमध्ये पुण्याचावदुसरा क्रमांक आहे.
विशेष म्हणजे पहिल्या पन्नास शहरांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील ११ शहरांचा समावेश आहे. या सर्वेक्षणामध्ये स्थानिक प्रशासन म्हणजेच महापालिका यांच्या कार्याचेसुद्धा सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ईंदौरने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने चौथा क्रमांक मिळवला आहे.
महाराष्ट्रातील जीवनसुलभ शहरे आणि क्रमांक
’१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या – पुणे (२), नवी मुंबई (६), बृहन्मुंबई (१०), ठाणे (११), कल्याण-डोंबिवली (१२), पिंपरी-चिंचवड (१६), सोलापूर (१७), नागपूर (२५), औरंगाबाद (३४), नाशिक (३८) आणि वसई-विरार (३९)
१० लाखापेंक्षा कमी लोकसंख्या असणार्या शहरांमध्ये अमरावतीने २७ वा क्रमांक मिळवला आहे.