दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी काल ट्रॅक्टर रॅली केली होती. यास हिंसक वळण लागल्याने प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले दिसून येते आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत पॅरामिलिट्री फोर्सेसच्या १५ कंपनी तैनात करण्यात येणार आहे. सध्याची दिल्लीतील परिस्थितीत सांभाळण्याकरता पॅरामिलिट्री फोर्सेसच्या या कंपन्या दिल्ली पोलिसांना मदत करतील. केंद्रीय गृह मंत्रालयाची सातत्याने शेतकऱ्यांच्या हिंसाचारावर नजर आहे. गृह मंत्रालयाने अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक झाली आहे.
दिल्लीतील विविध ठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्या. देशाच्या राजधानीचा मानबिंदू लाल किल्ला देखील हिंसक आंदोलनामध्ये सहभागी ठरला गेला. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सिंघ, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई आणि त्याच्या जवळपास क्षेत्रातील काल रात्रीपासून ११.५९ PM पासून इंटरनेट सेवा अस्थायी स्वरुपात बंद केली. तसेच दिल्लीतील मेट्रोच्या काही स्टेशन प्रवेश बंदी केली.
लाल किल्ल्यावर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी ‘पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?’ असा संतप्त सवाल केला आहे. “पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं? पोलिसांना पाहिजे तेव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती. पण आजपर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे?,” असा सवाल निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.