कोविडच्या भिन्न रिपोर्टमुळे बारामतीतील डॉक्टरांचा उडतोय गोंधळ

12

रॅपिड आणि आरटीपीसीआरच्या भिन्न रिपोर्टमुळे बारामतीतील डॉक्टरांचा अनेकदा गोंधळ उडत असल्याचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.हर्षवर्धन व्होरा यांनी सांगितले आहे. भिन्न रिपोर्टमुळे खाजगी प्रयोगशाळा चालक डॉक्टरांना मनस्तापाला सामोर जावं लागतं आहे.

अँटीजेन आणि आरटीपीसीआरची सेनसिटीव्हीटी ६० ते ७० टक्के असते. याचा अर्थ कोविड असून सुद्धा २० ते ३० टक्के रुग्णांमध्ये टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. सॅम्पल कसे घेतले, आजाराच्या कोणत्या टप्प्यावर घेतले, यावरसुद्धा रिपोर्ट अवलंबून असतो. त्यामुळे रिपोर्ट एका ठिकाणी पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या ठिकाणी निगेटिव्ह असा गैरसमज होतो. पॉझिटिव्ह हा रिपोर्ट पॉझिटिव्हच असतो असे त्यांनी सांगितले आहे.

ताप, अंगदुखी, सर्दी ,खोकला ,जुलाब असेल अथवा वास व चव नसेल तर टेस्ट करणे जरुरी आहे. कोणत्याही शंका असतील तर आपल्या डॉक्टरांचा कोरोना साथीचा अजून धोका टळलेला नसून नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. असा सल्ला जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ.हर्षवर्धन व्होरा यांनी केले आहे.