कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोना वर ?

22

कोरोना च्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन महाविकासआघाडी सरकार कायमच टीकेचे धनी बनत आले आहे. गेल्या वर्षीसुद्धा रुग्णसंख्येच्याबाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल होता. पुन्हा नव्याने आलेल्या कोरोना मुळे सुद्धा महाराष्ट्राने रुग्णसंख्येच्याबाबतीत ऊचल खाल्ली आहे. यावरुनच मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी पुन्हा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. कोरोना चे महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचे कोरोना वर? असा प्रश्न ऊपस्थित करत ऊद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हच्या शैलीत ठाकरे सरकारला निशाना केले अाहे.

महाराष्ट्रात कोरोना च्या वाढत्या रुग्णसंख्येवर मनसेने कायमच संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असणार्‍या मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत कोरोना चे रुग्ण कमी आहेत. महाराष्ट्रातच रुग्णसंख्या वाढते आहे. स्वत:चे अपयश आणि काळे कारनामे झाकण्यासाठी कोरोना चा सहारा घेतला जात असल्याचेसुद्धा संदिप देशपांडे यावेळी म्हणाले. कोरोना चे कारण देत निर्बंध लादण्यात येत आहे. परिणामी या निर्बंधांमुळे सामान्य माणसाचे आयुष्य मेटाकुटीला आले असल्याचेसुद्धा ते यावेळी म्हणाले.

संदिप देशपांडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. रुग्णसंख्या कमी झाली की आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न आणि वाढली की जनता जवाबदार हा काय प्रकार आहे? असा सवालसुद्धा त्यांनी यावेळी ऊपस्थित केला.

कोरोना च्या नावाखाली कडक निर्बंध लावायचे आणि हे सगळे निर्बंध सर्वसामान्यांसाठीच आहे का? मनसे या निर्बंधाच्या पहिलेपासूनच विरोधात आहे. मनसेने याअगोदरसुद्धा लोकल सुरु करण्यासाठी आंदोलने केले आहे. असेसुद्धा संदिप देशपांडे यावेळी म्हणाले.