‘न्यायालय चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार आदेश देते का ? तर लोकशाही संपली असं जाहीर करा’

27

ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचा विषय न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय त्यावर निर्णय घेईल. मात्र असे असताना भुजबळ यांना महागात पडेल अशा स्वरुपाची भाषा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वापरली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालय त्यांच्या बोलण्यावर आदेश देते असे चंद्रकांत पाटील यांना म्हणायचे आहे का? असे असल्यास लोकशाही संपली असे त्यांनी जाहीर करावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

अन्यथा न्यायालयास अवमानकारक अशा या वक्तव्यावर पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी तसेच त्यांच्या विरोधात सुमोटो याचिका दाखल करण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.