सिडनीमधीक ‘डॉमिनिक’ जन्म घेताच ठरला ‘या’ स्पर्धेचा विजेता

12

पिझ्झा बनवणारा डॉमिनोज हा जगातील सर्वात मोठा ब्रँड आहे. पिझ्झासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या फास्ट फूड चेन डॉमिनोजकडून ऑस्ट्रेलियाच्या एका दाम्पत्याला पुढील ६० वर्षांपर्यंत दर महिन्याला मोफत पिझ्झा देणार असल्याचे समजत आहे. ऑर्डर केल्यानंतर अर्ध्या तासात घरी पिझ्झा आला नाही तर मोफत पिझ्झा किंवा एकावर एक पिझ्झा फ्री अशा आकर्षक जाहिरातीमुळे कायमच चर्चेत राहिले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील एका जोडप्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुलाचे आई-वडिलांनी नाव ठेवले आणि त्याच नावामुळे आई-वडिलांचा आनंद आता गगनात मावत नाही आहे. या जोडप्याचे नाव क्लीमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथनी लॉट असे आहे. त्यांना ९ डिसेंबर रोजी मुलगा झाला आहे त्याचे नाव Dominic असे ठेवण्यात आहे. पण, आपल्याला या नावामुळे एवढे अनोखे गिफ्ट मिळणार आहे याचा त्यांनी विचार देखील केला नाही.

कंपनीने 9 डिसेंम्बर रोजी एका ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन केले होते. ९ डिसेंबरला जन्माला येणाऱ्या मुलाचे नाव Dominic असे ठेवल्यास त्यांना मोठे गिफ्ट देण्यात येईल अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. पण क्लीमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथनी लॉट यांना या स्पर्धेबाबत काही माहिती नव्हती. योगायोगाने त्यांना ९ डिसेंबरला मुलगा झाला आणि त्यांनी त्याचे नाव Dominic ठेवले. त्यांनी बाळासाठी हे नाव आधीच ठरवले होते.

डॉमनोज कंपनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली. प्रत्येक महिन्याला 14 डॉलरचा एक पिझ्झा पुढची 60 वर्ष या कुटुंबाला मोफत मिळणार आहे असे सांगितले. तसेच स्पर्धेचा विजेता जाहीर करताना त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये ते म्हणाले, “3.907 किलो म्हणजे अंदाजे 23 गार्लिक ब्रेड इतकं वजन असणारा आमच्या स्पर्धेचा विजेता आहे.”