अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सत्तेतून दूर झाल्यावर पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या नात्यात संघर्ष सुरू झाला आहे. त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडाला गेल्यापासून मेलानिया ट्रम्प जास्तीत जास्त काळ ‘स्पा’मध्ये घालवत आहे. त्यामुळेच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा अंदाज लावला जात आहे. आता मेलानिया आणि ट्रम्प यांच्या घटस्फोटाच्या बातम्या देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
या कटुतांमुळे मेलेनिया आणि ट्रम्प यांच्यात घटस्फोटाची अटकळही तीव्र होत आहे. इतकेच नाही तर मेलेनियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केली आहेत. व्हाईट हाउस सोडल्यापासून मेलानिया ट्रम्प रहस्यमयपणे लोकांपासून दूर आहेत आणि आपला बहुतांश वेळ स्पामध्ये घालवत आहेत. मेलानिया ट्रम्प यांना 20 जानेवारी रोजी अखेरचे पाहिले होते. तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. अशी माहिती मिळत आहे की, त्या सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून टाळत आहेत. पण अलीकडेच त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून सर्व पोस्ट डिलीट केल्या आहे. त्यामुळे ड्रम्प दाम्पत्याच्या नात्यात काहीतरी धुसमसत असल्याचा अंदाज लावला जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळत आपला वेळ घालवत आहेत. त्याच वेळी, सुपर बाऊल पार्टीत मेलानिया डोनाल्ड ट्रम्पबरोबर गेली नव्हती. मेलानियाच्या या वागणुकीमुळे तिला घटस्फोट घेण्याची अटकळ आणखी तीव्र केली आहे. तथापि, अद्याप कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. व्हाईट हाउसच्या एका माजी अधिकार्याने असे सांगितले की, व्हाईट हाउसमध्ये मुक्काम असताना मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कटुता वाढली होती आणि त्यांचे संबंधांमध्ये देखील दुरावा आला होता. मात्र, घटस्फोटाचा अटकळ मेलानियाने पूर्णपणे नाकारला आहे.