“भाजपशी अॅडजस्ट नाही त्यांच्याविरोधात आक्रमक व्हा” अजितदादांचा पदाधिकार्‍यांना बुस्टर डोस

222

आगमी काळात राज्यात विविधठिकाणी महापालिका निवडणुका येणार आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचासुद्धा समावेश असणार आहे. या पार्श्वभूमिवरच ऊपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करत बुस्टर डोस दिले आहेत.

अनेक पदाधिकार्‍यांनी चिंचवड महाोालिकेतील सत्ताधारी भाजविरोधात अजित पवारांकडे तक्रारी केल्यात. यावर पवार म्हणाके सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या कामांना जनतेसमोर आणा, तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका सक्षमतेने पार पाडा, तुम्ही न बोलणव म्हणजे अॅडजस्ट होण्यासारखे आहे. त्यामुळे बोला, अॅडजस्ट न होता आक्रमक व्हा” अशाप्रकारे अजित पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण केला आहे.

दरम्यान पक्षातील काही पदाधिकार्‍यांची कानउपटणीदेखील यावेळी त्यांनी केली. मी महापालिकेत नसलो तरी, कुण किती ठेके घेतो, किती टक्केवारी घेतो याची सगळी खबरबात माझ्याकडे आहे. चुकीच्या कामांना आपल्या पक्षाचत थारा नाही. प्रामाणिकपणे काम करा, सत्ताधार्‍यांच्या चुकांना बाहेर काढा आणि त्यांना जाब विचारा,” असेसुद्धा अजित पवार यावेळी म्हणाले.

महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे. मात्र पिंपरी-चिंचवड परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मरगळल्याचे रुप प्राप्त झाले होते. अजित पवारांच्या या बुस्टर बैठकीमुळे आता राष्ट्रवादी पुन्हा नव्या जोमाने कामास लागेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांकडून व्यक्त केला जातो आहे.