पुण्याच्या रक्तवाहिनीला वेठीस धरु नका” अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांसह गिरीष बापट यांनी पीएमपीएल बसमध्ये बसून आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीएमपीएल बस सेवा बंद केल्याने पुणेकरांची गैरसोय होत असून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट पीएमपीएल डेपोसमोर या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले होते.
‘आम्हाला सरकारला सहकार्य करायचे आहे, राजकारण करायचे नाही. चुकीच्या नियोजनाचा किती मोठा फटका बसतो याचा अनुभव घेतला आहे” यावरुन सरकारने शहाणे व्हावे” अशी खोचक प्रतिक्रिया बापट यांनी यावेळी दिली.