महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होते आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांकडून वारंवार लॉकडाऊनचा ईशारा दिला जातो आहे. मात्र कॉंग्रेसने लॉकडाऊनच्या विरोधात भूमिका घेतली असून मुख्यमंत्र्यांनाही ती पटणार असे म्हटले आहे.
लघू व मध्यम ऊद्योजक, हातावर पोट असणारे कामगार, मजूरवर्ग, गरिब यांच्यावर लॉकडाऊनचा प्रचंड परिणाम होतो. सर्वस्तरीय व्यवस्था ठप्प झाल्याने अर्थकारणालासुद्ध त्याचा फटका बसतो. त्यामुळे लॉकडाऊन लावू नये असे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनबाबत महाविकासआघाडी सरकारमध्ये वेगवेगळे सुर ऐकायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनीसुद्धा लॉकडाऊन न लावण्याचीच भूमिका घेतली आहे. आता त्यापाठोपाठ कॉंग्रेससुद्धा लॉकडाऊनच्या विरोधात आहे.
लॉकडाऊनऐवजी निर्बंध अधिक कठोर करण्यावर भर असला पाहिजे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी सामान्य जनतेस अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी निर्बंध कडक करणेच योग्य ठरेल असे मतसुद्धा भाई जगताप यांनी मांडले आहे. मुंबईच्या कॉंग्रेस कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते.