पेट्रोल आणि डिझेलच्या भावांनी गेल्या काही दिवसांत ऊच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमिवर शिवसनेने केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ५ फेब्रुवारी रोजी शिवसेना राज्यभरात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार आहे. यावर फडणवीसांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. “शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये” अशा शब्दात त्यांनी सेनेस सुनावले आहे. “ईंधनरदरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करावा आणि भाववाढ नियंत्रणात आणावी” असे फडणवीस यावेळी म्हणाले. नागपूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
‘आम्ही सरकारमध्ये असताना पेट्रोल- डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल डिझलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर २ रुपयांनी कमी केले होते. आणि तेव्हा महाराष्ट्राच एकही रुपयाचं नुकसान झालं नव्हतं. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल – डिझलचे भाव नियंत्रणात आणावे,’ अशी मागणीसुद्धा फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीजबिलांवरुनसुद्धा राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात लोकांना वीज बिलाचे कनेक्शन तोडण्याच्या नोटिशी राज्य सरकारने दिल्यात ते पाहता राज्यात मोगलाई आलीये, या विरोधात भाजप संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शन करणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.