बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे ती नेहमी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे ती एका कवितेमुळे सध्या तिची ‘राख’ ही कविता चांगली चर्चेत आली आहे.या कवितेचा अर्थ अतिशय सुंदर आहे. कवितेतून कंगनाने तिच्या चाहत्यांना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
कंगना या कवितेतून म्हणते, ‘मेरी राख गंगा में मत बहाना। हर नदी सागर के साथ जाकर मिलती है। मुझे सागर की गहराइयों से डर लगता है। मैं आसमान को छूना चाहती हूं। कंगना काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबासोबत हायकिंगला गेली होती. यादरम्यानचे पहाडांवर घालवलेले क्षण आणि बॅकग्राऊंडमध्ये तिने लिहिलेल्या या कवितेच्या ओळी असा सुंदर व्हिडीओ तिने चाहत्यांना शेअर केला आहे.
कंगनाने यापूर्वी ‘आसमान’ नावाची कविता लिहिली होती. कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे त्यासोबत एक कवयित्री सुद्धा आहे, हेच तिच्या या कवितांवरून दिसून येत आहे. सध्या सोशल मिडियावर चाहते तिचे कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती धाकड चित्रपटासाठी फिजिकली तयार होताना दिसत होती. चित्रपटाच्या शूटिंगला जानेवारी महिन्यात सुरूवात केली जाणार आहे.