मुंबई : सध्या राज्यात कोरोचा उद्रेक पाहायला मिळत आहे, त्यामुळे डबल मास्क लावण्याची वेळ आल्याचे विधान मुंबई मनपा आयुक्त चहल यांनी केल्यानंतर आता त्या पाठोपाठ मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना डबल मास्क तसेच फेस शिल्ड वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. रस्त्यावर बंदोबस करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अनेकांशी संबंध येत असतो याच पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आलेला आहे.
मागच्या काही दिवसांपासुन मुंबईत करोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतत बंदोबस्त करावा लागत आहे. मुंबई पोलीस सतत रस्त्यावर , लोकांमध्ये असतात. याचा परिणाम पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाणही मोठया प्रमाणात वाढलेले आहे.
तुम्ही वापरत असलेला डबल मास्क तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घ्या. जर तो योग्यरित्या बसत नसेल तर तो कोरोना सहज तुमच्या शरीरात शिरकाव करु शकतात, त्यामुळे ते धोकादायक ठरते. दोन मास्क घातल्याने तुमचा कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव होऊ शकतो असे वैज्ञानिकांचे मत आहे.