‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच अभिवादन करा; जयंतीचे चैत्यभूमीतून थेट प्रक्षेपण’

5

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ई-बैठक संपन्न झाली आहे. कोरीनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

जयंती समन्वय समितीचा #BreakTheChain ला प्रतिसाद देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. जयंती उत्सवाचे चैत्यभूमी स्मारकातून थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्यासह गृहमंत्री मा. दिलीपराव वळसे पाटील, नगरविकास मंत्री मा. एकनाथजी शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री मा. सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. विश्वजित कदम यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

आदरणीय डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्साहात पूर्ण सन्मानाने साजरी केली जाईल. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच त्यांना अभिवादन करावे. महामानवाच्या थोर विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे व नियमांचे पालन करावे.
असे आवाहन करण्यात आले आहे.