कायम चर्चेत असलेल्या भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सर्व नागरीकांना गोमूत्र पिण्याची आणि गो पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
गोमूत्र पिल्याने फुफ्फुसाचा संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्रं घेते, त्यामुळेच मला कधी कोणतं औषध घ्यावं लागलं नाही. मला कोरोनाची लागण झाली नाही, असं ठाकूर यांनी म्हटलंय.
कोरोना संकटाच्या या प्रसंगी सर्वांनी सावध राहावं. संबंधित गाईडलाईन सर्वांनी पाळली पाहिजे, असं आवाहनही ठाकूर यांनी केलं आहे. खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ठाकूर यांना क्वॉरंटाईन व्हावं लागलं होतं.