अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ ऊडाली होती. सुशांत राजपुत याचा मृत्यु संशयास्पद असल्याचा दावा अनेकांनी केला. त्यानंतर यावरुनच राजकारणसुद्धा तापले होते. मात्र चौकशीने वेग घेतल्यानंतर यामध्ये मोठ्याप्रमाणात ड्रग्ज तस्करीचे प्रकरण समोर आले आणि त्यानंतर एनसीबीकडे हा तपास सोपवण्यात आला. एनसीबीने याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया आणि तिच्या भावास ताब्यात घेत अनेक बॉलीवुड सेलीब्रिटींचे जवाब नोंदवून घेतले. त्यानंतर अलिकडे एनसीबीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दरम्यान एनसीबीने गोव्यात धाडी टाकल्या आहेत. यामध्ये एनसीबीकडून काही ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. यांमध्ये सुशांतला ड्रग्ज पुरवणार्याचा समावेश असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. तसेच या छापेमारीत मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थांचा साठा एनसीबीला सापडला आहे.
सुशांतच्या संशयित आत्महत्येनंतर सर्वप्रथम त्याची गर्लफ्रेंण्ड रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शोवीक या दोघांस एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. या दोघांच्या अटकेनंतर बॉलीवुडमधील अनेक मोठ्या सेलीब्रीटींची नावे सामोर आली होती. याप्रकरणात एनसीबीने आतापर्यंत ५ जणांचा जवाब नोंदवण्यात आला आहे.
दोषारोपपत्र सादर केल्यानंतर एनसीबीने गोव्यात छापेमारी केली. यामध्ये काही ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन परदेशीय नागरिकांसोबतच ईतर तिघांचा समावेश आहे. यातीलच एकजण हा सुशांतला ड्रग्ज देत असल्याचे एनसीबीने सांगीतले. तसेच झालेल्या कारवाईत एनसीबीने एकुण २२ ग्रॅम कोकेन, २८ ग्रॅम चरस, १.१०० ग्रॅम गांजा एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.