कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये वीजग्राहकांना भल्यामोठ्या आकड्यांचे बील आल्याच्या घटना राज्यभरात आढळल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये वापराच्या अव्वा का सव्वा बील आल्याच्या तक्रारी राज्यभरातून करण्यात येत होत्या. यावरुन भाजप आणि मनसे यांनी राज्य सरकारला जाबसुद्धा विचारला होता. मात्र आता ग्राहकांना बील न भरल्यास थेट लाईन कापण्याच्या नोटीसा आल्या. भाजपाने यावर आक्रमक पवित्रा घेत ५ फेबृवारीला राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या अंदोलनादरम्यानच पुण्यातील निलम टॉकीजजवळच्या महावितरण कार्यालयाला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भलेमोठे कुलुप ठोकण्यात आले. या कुलुपाचे फोटो व्हायरल होत असून सोशल मिडियावर चांगलेच गाजते आहे.
लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना महाविरणकडून जास्तीचर बील आले अशा तक्रारी करण्यात येत होत्या. वापरापेक्षा अधिक बील आल्याने आणि लॉकडाऊनमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असल्यामुळे त्यांच्या खिशाला अधिक ताण न द्यावा या मागणीसह भाजप आणि मनसेने वाढीव वीजबिलावरुन राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावर तोडगा काढत ग्राहकांना हप्त्यांमध्ये बील भरण्याची सोय करुन दिली होती. मात्र आता महाविरणकडून ग्राहकांना थेट वीज कापण्याच्या नोटीसी पाठवण्यात आल्या. सामान्यांनाच हा नाहक त्रास का? असे म्हणत भाजपाने राज्यभर आंदोलन करण्याचा ईशार दिला होता.
दि. ५ फेबृवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्याचे ऊपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र या आंदोलनावर शंका ऊपस्थित केली. ईंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारविरुद्ध करण्यात येणार्या आंदोलनावरुन लक्ष हटविण्यासाठी हे आंदोलन आहे असा आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केला. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. आंदोलनाच्यावेळी महाविरणच्या कार्यालयासमोर महाविकासआघाडी सरकारविरोधात निदर्शनेसुद्धा करण्यात आली. सोबतच अनेक ठिकाणी महाविरणच्या कार्यालयाला टाळेसुद्धा ठोकण्यात आले.
टाळे ठोकण्यावरुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर कारवाईसुद्धा करण्यात आली. भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तू-तू-मै-मै झाल्याचेसुद्धा स्थानिक प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे.