शूटिंग दरम्यान गुरू रंधवाच्या नाकातून अचानक वाहू लागले रक्त; पहा काय आहे प्रकार

13

अनेकवेळा कलाकारांना शूटिंग दरम्यान अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. शूटिंगवेळी कलाकार जखमी देखील होतात. तसेच अपघात देखील होत असतात. अशा प्रकारे शूटिंग दरम्यान गुरु रंधावालाही सामना करावा लागला आहे.काश्मीरच्या बर्फाळ वातावरणात गुरु रंधावा अपकमिंग प्रोजेक्टचे शुटिंग करत होता.माइनस 9 डिग्री सेल्स‍ियस मध्ये गुरु रांधावाचे शूटिंग सुरू आहे.

काश्मीरमधील हवामानाविषयी काही वेगळे सांगायला नको. इतक्या थंडीतही सगळेचजण कोणत्याही गोष्टीची तक्रार न करता काम करत असतात. गुरु रांधावाने नुकताच शूटदरम्यानचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या फोटोत त्याच्या नाकातून रक्क वाहत असल्याचे दिसत आहे. इतक्या थंडीत शूट सुरु असल्यामुळे गुरुला थंडीचा त्रास होत असून नाकातून रक्ताच्याच धारा वाहू लागल्याचे दिसत आहे.

हा फोटो गुरुनेच ट्विटरवर पोस्ट केला आहे. चाहत्यांनी हे फोटो पाहताच चिंता व्यक्त केली आहे. एकाने लिहिले – काळजी घे, दुसर्‍या युजरने म्हटले की, तु खूप कष्ट करत आहे. ही नक्कीच सुपरहिट ठरेल. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर गुरुने शूट पूर्ण केले. त्यामुळे नक्कीच चाहत्यांना ते आवडले अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.

अभिनेत्री गायिका मृणाल ठाकूरसह सोबत ‘अभी ना छोड़ो मुझे’चे शूट गुरूने केले होते. हा म्युझिक व्हिडिओ काश्मीरच्या गुलमर्ग या ठिकाणी शूट करण्यात आला आहे. यांत दोघांची केमिस्ट्री जास्तच जुळली आहे. मृणालने गुरु रंधावाबरोबर बरेच फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत आणि चाहत्यांनी यास पसंती दाखवली आहे.