देशात कोरोनाचे संकट थैमान घालत आहे. कित्येक महिने लॉकडाऊन नंतर देश अनलॉक झाला आहे आणि मग बॉलिवूडने देखील शूटिंगचे काम सुरू केले आहे. वरूण धवनचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’च्या शुटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर, वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. ही बातमी कळताच या चित्रपटाचे शूटिंग तात्काळ थांबविण्यात आलेले आहे.
अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार गुरुवारी संध्याकाळी या कलाकारांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला आहे. ज्यानंतर निर्मात्यांनी शुटींग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत चारही सेलिब्रिटी पूर्णपणे ठिक होत नाहीत, तोपर्यंत ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची शुटींग पुन्हा सुरु करण्यात येणार नाही. ‘गुड न्युज’ नंतर आता राज मेहता ‘जुग जुग जियो’ या सिनेमावरती काम करत आहेत. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत वरून धवन आणि कियारा आडवाणी असणार आहेत. याचदरम्यान आता ‘जुग जुग जियो’ या सिनेमामध्ये वरून धवन व कियारा सोबत यंग लीड कपल नीतू कपूर आणि अनिल कपूर देखील असणार आहेत. या चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर एका कपलची भूमिका साकारताना दिसणार आहेत.