इनकम टॅक्स आजपासून सुरू करणार ई-फाइलिंग वेब पोर्टल

8

आज सात जूनपासून नवे ‘ई-फाइलिंग वेब पोर्टल’ इनकम टॅक्स विभाग सुरू करणार आहे. प्राप्तिकर विभागाची www.incometax.gov.in ही नवीन वेबसाईट आहे. 

नवीन ई-फाइलिंग पोर्टलद्वारे करदात्यांना एक आधुनिक आणि अखंड सेवा देणे, हे सीबीडीटीचे (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) मुख्य उद्दिष्ट आहे.

या वेबसाईटवर आयटीआर फाइलिंग करण्यासह अन्य सर्व महत्त्वाची कामं करता येणार आहे.करदात्यांना तातडीने आयटीआर फाईलिंग (ITR e-filing website केल्यानंतर रिफंड मिळावा यासाठी आणि ही प्रक्रिया सुकर करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.