अमरावती मतदारसंघाच्या खा. नवनीत राणांना एसीड हल्ला करुन जखमी करण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या दिल्ली येथील शासकीय कार्यालयात हे पत्र आले आहे. या पत्रावर शिवसेनेचा लोगो आहे. सोबतच खाली सच्चा शिवसैनिक असासुद्धा ऊल्लेख करण्यात आला आहे.
नवनीत राणा यांनी याप्रकरणी दिल्लीतील नॉर्थ एवेन्यु पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे.
नवनीत राणा या कायम संसदेत रोखठोक भूमिका मांडत असतात. विदर्भाचा आवाज बुलंद करणार्या नेत्या म्हणूसुद्धा त्यांची अोळख आहे. यावेळी नवनीत राणा यांनी ठकारे सरकारवर निशाना साधत महाविकासआघाडी सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यानंतर शिवसेनेच्या लोगोसबत आणि सच्चा शिवसैनिक असे म्हणत हस्तगत झालेले धमकीचे पत्रकामुळे विविध चर्चांना ऊधान आले आहे.
शिवसेनाप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्यविरोधात भाष्य केले असल्यामुळे या पत्रात संताप व्यक्त करण्यात आला आहे. “ज्या चेहर्यावर आपण घमेंड करता त्या चेहर्यावरच एसीड टाकुन विदृप करेन असे या पत्रात नमूद आहे. तसेच तुमचे पती रवी राणा यांचासुद्धा तोच हाल करेन जो ईतरांचा केला”. अशाप्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य या पत्रात आहेत. पोलिस याप्रकरणी चौकशी करत आहेत.
नवनीत राणा या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ताकदवर ऊमेदवार आनंद अडसुळ यांचा पराभव करत विजयी झाल्या आहेत. नवनीत राणा या कायम अमरावती व परिसरातील समस्यांना संसदेत वाचा फोडण्याचे काम करत असतात. अमरावती मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. अलीकडे राणा दाम्पत्यांनी महाविकासअघाडी सरकारला वारंवार लक्ष केले आहे. परंतू अशाप्रकारे धमकीचे पत्र आले असल्यामुळे राणा गटातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.