ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी :बच्चू कडू

45

गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याचं समोर येत आहे. हल्लीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. यावर बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. 

इडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे इडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ?अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींवर टीका केली आहे. 

‘ईडीच्या प्रमुखांना काही इमानी इभ्रत काही जिवंत असेल आणि भारताचे नागरिक असाल तर त्यांनी सांगा की ते मोदीचे गुलाम आहेत की भारतीय घटनेचे अधिकारी आहेत? एका तरी भाजपच्या नेत्यावर, आमदारांवर चौकशी झाली असेल असे एखादे उदाहरण सापडलं नाही. हे सर्व गंगास्नान करून आलेत का? याच्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्येदेखील इतका अतिरेक झाला नाही याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल’ असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.टीव्ही 9 मराठीशी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.