ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणारे कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी स्वप्नाली यांची चौकशी होणार आहे.
विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. अविनाश भोसले यांची २७ नोव्हेंबर २०२० रोजी ईडीने तब्बल दहा सात चौकशी केली होतीईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीने स्वप्नाली कदम यांना समन्स बजावल होतं.
अविनाश भोसले यांची २७ नोव्हेंबर २०२० रोजी ईडीने तब्बल दहा सात चौकशी केली होती. FEMA या कायद्यांतर्गत चौकशी करण्यात आली होती. यापूर्वी आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.
विश्वजित कदम यांनी पत्नीला आलेल्या नोटीसवर बोलण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं स्पष्टीकरण विश्वजित कदम यांनी दिले असून, सध्या यावर मी बोलणार नसल्याचंही कदम म्हणाले आहेत.