शिक्षण मंत्री दौर्‍यावर विद्यार्थी मात्र वाऱ्यावर :अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचा नारा

14

अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेतर्फे नाशिक कॉलेजरोडवरील गोखले एज्‍युकेशन सोसायटी प्रांगणात आंदोलन केले. “राजकारण नका करु, महाविद्यालये सुरू करा’, “शिक्षण मंत्री दौर्‍यावर विद्यार्थी मात्र वाऱ्यावर ” यासह आंदोलनकर्त्यांनी अन्‍य घोषणा दिल्‍या.

राज्यव्यापी महाविद्यालय उघडा आंदोलनात सहभागी होतांना नाशिक महानगर कार्यकारणीतर्फे बीवायके महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय यासह एकूण तीन ठिकाणी आंदोलन केले आहे. महाविद्यालयातील प्राचार्यांमार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदनही दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय व महाविद्यालयांची वस्तीगृह त्वरित प्रत्यक्ष सुरू करावी. सोबतच बस थांबा, खानावळी आदी विद्यार्थी गरजेची ठिकाणे सुरू करावी अशी मागणी अभाविपतर्फे केली.

यावेळी प्रदेश सहमंत्री विराज भामरे, जिल्हा संयोजक अथर्व कुलकर्णी, जिल्हा सहसंयोजक ऐश्वर्या पाटील, महानगर मंत्री सिद्धेश खैरनार, राकेश साळुंखे, महानगर सहमंत्री सौरभ धोत्रे, ओम मालुंजकर, दिव्या सिंग, श्रेयस पारनेरकर, हर्षदा कदम, ऋषिकेश शिरसाठ आदी उपस्‍थित होते.