लसीकरणाचा रक्तसाठ्यावर परिणाम! राज्यात आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक

8

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव ऊपाय असल्यामुळे आरोग्यविभागाकडून लसीकरणाच्या मोहीमेवर भर देण्यात येतो आहे. लसीकरणामुळे आरोग्यविभागाचे रक्तसाठ्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान न करण्याच्या मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. परिणामी रक्तदानाच्या प्रमाणात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे आता अाठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे.

राज्यात रक्ताचा तुटवडा भासणे ही चिंतेची बाब आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये केवळ २५ हजार रक्तपिशव्या शिल्लक आहे. रक्ताचा साठा कमी झाल्यामुळे विविध शस्त्रक्रियांसाठी रक्त मिळणे कठीण झाले आहे.

राज्यात जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन आता होत आहे. परंतू लसीकरणाच्या मार्गदर्शन सुचनांमुळे सर्वत्र घोळ होतो आहे. आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्य रक्तसंक्रमण परिषदेला विशेष आर्थिक मदत आणि मनुष्यबळ पुरवण्याची गरज होती. मात्र यासाठी कुठल्याही प्रकारची तरतुद करण्यात आलेली नाही. परिणामी ऐच्छिक रक्तदानावर याचा परिणाम होणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

मोठ्याप्रमाणत रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्याचे आदेश सर्व रक्तदाता संघटना तसेच सामाजिक संघटनांना देण्यात आले आहेत. राष्ट्रीय मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लस घेण्याअगोदर एकदा तरी रक्तदान करा असे आवाहन केले जात असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगीतले आहे.