ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी, शिवसेना आमदार अंबादास दानवे यांचे प्रयत्न

9

औरंगाबाद जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी शहरातील खाजगी मेडिकल ऑक्सिजन प्लांटला प्रशासकीय अधिकारी समवेत विधानपरिषद आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भेट दिली. आणि प्लांटचा आढावा घेतला.

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व पर्याय शोधत खाजगी प्लांटच्या चालक व जिल्हा प्रशासनाचा समन्वय साधत, जास्तीत जास्त ऑक्सिजन पुरवठा खाजगी ऑक्सिजन प्लांटच्या सहाय्याने हॉस्पिटलला या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे तेथील समस्या जाणून घेऊन काही सूचनाही दानवे यांनी केल्या.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रेल्वेने ऑक्सिजन आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच, ऑक्सिजन प्लांटवर प्रशासक आणि राजकीय पुढारी लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे लवकरच ऑक्सिजनची कमतरता भरून निघेल आशी सामान्य नागरिकांना अशा आहे.