एकही दिल हैं महिंद्राजी कितने बार जितोगे : महिंद्रांच्या प्रयत्नांनी १ रुपयात इडली विकणाऱ्या ‘इडली अम्माना’ मिळणार घर

242


अवघ्या १ रुपयांत इडली विकणाऱ्या इडली अम्माला आनंद महींद्रांच्या प्रयत्नांनी स्वतःच घर मिळणार आहे. १ रुपयांत इडली विकणाऱ्या कमलाथाल ह्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या होत्या. अवघ्या १ रुपयांत इडली, चटणी, सांबार त्या खायला घालत.

याआधी आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत इडली अम्माना एलपीजी कनेक्शन देण्याबाबत सांगितलं होतं. त्यांच्या या ट्विटची दखल घेत भारत गॅस कोयांबटुर यांनी इडली अम्मा यांना कनेक्शन जोडून दिले होते.

आज सकाळी आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, इडली अम्माच्या व्यवसायात महिंद्रा समूहाने गुंतवणूक करणं उत्तम आहे. ज्या ठिकाणी त्या जेवण बनवतात, त्या ठिकाणी घर असणं ही प्राथमिकता आहे. जिथून त्या इडली बनवू आणि विकू शकतील. याची जाणीव झाली. त्यानंतर महिंद्रा समूहाने त्यांच्या नावावर जमीन रजिस्टर करण्यासाठी मदत केली. महिंद्रा ग्रुपची रियल इस्टेट शाखा लवकरच त्यांच्या घराचं बांधकाम सुरू करणार आहे. असं आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे.