एकनाथ खडसेंना पुन्हा कोरोनाची लागण

49

नोव्हेंबर महिन्यातही एकनाथ खडसेंना करोनाची बाधा झाली होती.त्यांना उपचारांसाठी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण करोनाची चाचणी केल्याचंही त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा करोनाची बाधा झाली आहे का? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी केलेलं ट्विट.आपण १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

आज एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात आलेल्या नोटीशीमुळे जाणार होते. मात्र ते रद्द करत त्यांनी १४ दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय वैद्यकीय सल्ल्यामुळे घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्या करोना चाचणीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.