एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा म्हणाले…

126

गेल्या काही दिवसांपासून जळगावात एकनाथ खडसेंनी ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात खडसेंनी भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधल्याचं ऐकायला मिळत आहेत.

मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतोच, मी मुख्यमंत्री होणार होतो पण मला डावलून दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवलं असं विधान भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खडसेंनी केले आहे.

माझं संतुलन बिघडलं असं म्हणतात, मी ठणठणीत आहे खात्री करायची असेल तर येऊन बघावं. मला सगळं माहिती आहे. १९९४ च्या फर्दापूरच्या भानगडीपासून सगळं माहिती आहे. मी वैयक्तिक कमेंट केली नाही. मतदारसंघातील लोकांचा संताप आहे असा इशाराही एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना दिला आहे.