मुळची बीड जिल्ह्यातील पुजा चव्हान या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या तरुणीच्या अात्महत्येच्या मागे महाविकासआघाडी सरकारमधील नेत्याचे नाव समोर येत असल्यामुळे या प्रकरणांस राजकीय वळण लागले आहे. पुजा चव्हान अात्महत्या प्रकरणांत विदर्भातील शिवसेनेचे आमदार तसेच महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे येत आहे. या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक झाली असून, भाजपतर्फे चौकशीची मागणी लावूम धरण्यात येत आहे. तिकडे संजय राठोड यांनी अद्याप या प्रकरणावर चुप्पी साधली आहे. परंतू शिवसेनेचे नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सावध प्रतिक्रिया देत शिवसेनेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
पुजा चव्हान हीची आत्महत्या प्रेमसंबंद्धातून झाली आहे असे तीच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या अॉडिअो क्लीपवरुन स्पष्ट होते आहे. पुजा चव्हान ही सोशल मिडिया स्टार असून तीला राजकीय क्षेत्रातसुद्धा आवड होती. पुजाच्या आत्महत्येमागे महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहे. अशांतच भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांच नाव घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर मात्र एकामागे एक भाजप नेत्याने या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
यावर भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आ. अतुल भातखळकर यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. संजय राठोड यांनी अद्याप यावर कुठलिही प्रतिक्रिया दिलेली नाही. संजय राठोड हे शिवसेनेचे दिग्रस मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले आमदार आहेत. सध्या त्यांच्याकडे वनमंत्री खात्या2ची जवाबदारी आहे. यावर महाविकासआघाडी सरकारमधील नेते कुठलिही प्रतिक्रिया देत नाहीयेत. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
पुजा चव्हाणची आत्महत्या ही दुर्देवी आहे. मात्र, त्या घटनेशी संजय राठोड यांचं नाव जोडणं योग्य होणार नाही. यासर्व प्रकरणात माहिती घेतल्यानंतरच बोलणं उचित होईल, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. जालन्यात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.