मतदार जनजागृती करणाऱ्या माध्यमांना निवडणूक आयोग देणार ‘राष्ट्रीय माध्यम पुरस्कार’

1

मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया ॲवॉर्ड) देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रसारमाध्यमांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे दि. 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

विविध माध्यमातून मतदार जनजागृती करणाऱ्या माध्यम संस्थांसाठी हे पुस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये वर्तमानपत्र (प्रिंट मीडिया), इलेक्ट्रॉनिक (दूरचित्रवाहिनी) मीडिया, इलेक्ट्रॉनिक (रेडिओ) मीडिया व ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया अशा चार विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माध्यमांद्वारे सुलभ मतदान, मतदान प्रक्रियेसंदर्भात जागृती, मतदानाचे महत्त्व आदी विषयांवर विविध माध्यमातून जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या माध्यमांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.