मराठवाडा पदवीधर रणधुमाळी, प्रहारच्या सचिन ढवळे यांची प्रचारात आघाडी…

4

मराठवाडा पदवीधर निवडणूक होऊ घातली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात तब्बल ३५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. मात्र, खरी लढत, सतीश चव्हाण ( राष्ट्रवादी ), सचिन ढवळे ( प्रहार ) आणि शिरीष बोराळकर ( भाजपा ) यांच्यात पाहायला मिळते आहे. गेल्या १२ वर्षापासून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. यंदा संयुक्त महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत. प्रहार पक्ष सरकार मध्ये असला तरी बच्चु कडू यांनी आपला उमेदवार मराठवाडा पदवीधर मतदासंघातून उभा केला आहे.

सोशल मीडियातून सर्वाधिक पसंती प्रहारला मिळताना पाहायला मिळतंय. तसेच प्रहार उमेदवाराला ठिकठिकाणच्या प्रचार सभेत मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे विरोधकांनी सचिन ढवळे यांची धास्ती घेतल्याचं चित्र आहे. विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यावर नाराज असलेल्या पदवीधर उमेदवारांनी सचिन ढवळे यांना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक तालुक्यात त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. राज्यमंत्री कडू यांनी आपली पूर्ण ताकत सचिन ढवळे यांच्या पाठीशी उभी केली आहे.

पदवीधर मतदार संघात मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून, राज्यमंत्री कडू हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. सचिन ढवळे यांच्यासाठी ते ठिकठिकाणी प्रचार दौरे करणार आहेत. अनेक राजकीय नेत्यांना भेटून प्रहार उमेदवाराला निवडून आणण्यासाठी साकडे घालणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक नेते आतून प्रहार उमेदवाराला मदत करणार असल्याची माहिती आहे. भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर हे सध्या प्रचार करत असले तरी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाऊ शकतात अशी परिस्थीती आहे. खरी लढत सतीश चव्हाण आणि सचिन ढवळे यांच्यामध्ये असल्याचं दिसतंय.