कोरोनानंतर पहिली निवडणूक; महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर

6

कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. पुणे, औरंगाबाद, आणि नागपूर पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक या पाच जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच याबद्दलच्या अधिसूचना प्रकाशित केल्या आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि भाजपा आमनेसामने येतील.

१२ नोव्हेंबर पर्यंत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालावधी असून, १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सहमतीने निवडणूक लढवेल असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणूक ही शिक्षितांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शिक्षितांमध्ये आपली ओळख कमावण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.