खुर्चीला मिठी ,कारण कायद्याची भीती

13

सरकारमधून कोणी ही बाहेर पडले, तर अन्य पक्ष त्यांची पोलखोल करतील ही भीती‌ या सर्वांना आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे‌ यांनी व्यक्त केले.

 “खुर्चीला मिठी ,कारण कायद्याची भीती” असे सध्याच्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे सूत्र आहे . त्यांच्या एकत्र येण्यामागे भाजपाचा विरोध हे वरवर दिसणारे कारण असले तरी विधिनिषेधशून्य राजकारण करून सत्तेची फळे चाखण्यासाठीची त्यांच्यातील चढाओढच अंतिमतः त्यांचा घात करेल. त्यांच्या एकत्र येण्यामागे कोणतेही वैचारिक व धोरणात्मक अधिष्ठान नाही.

महाराष्ट्रातील सरकारला नैतिक अधिष्ठान नाही. सत्तेसाठी तडजोड करून ते एकत्र आले आहेत. त्यात सध्याच्या राज्यातील घडामोडी पाहाता सत्तेतील तिन्ही पक्ष बदनाम झाले आहेत. सचिन वाझे हे शिवसेनेशी संबंधित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुलीचे आरोप आहेत.

महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय वातावरण, पश्चिमी बंगाल, केरळ, आसाममधील निवडणुका आदी मुद्द्यांवर ‘सकाळ’शी ते बोलत होते. सचिन वाझे हे शिवसेनेशी संबंधित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुलीचे आरोप आहेत. काँग्रेसही या प्रकाराला पाठिशी घालत असल्यामुळे या सर्व पक्षातील आमदारांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.