कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तीसर्या टप्प्यास १ एप्रीलपासून संपूर्ण देशात सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी लसीकरण हा एकमेव ऊपाय आहे. असे मत अनेक तज्ज्ञांनी मांडले आहे. या पार्श्वभूमिवर वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले आहे.
लसीकरणाच्या तीसर्या टप्प्यास वाशिम जिल्हाभरातील विविध लसीकरण केंद्रांवर सुरुवात करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये एकुण ८८ लसीकरण केंद्रे आहेत. ज्यामध्ये आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, ऊपजिल्हा रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालय, खाजगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीबद्दल लोकांमध्ये काही गैरसमज आहे. अशावेळी स्थानिक प्रशासनाने जनजागृतीची व्यापक मोहीम राबवून परिसरातील पात्र व्यक्तींना लस घेण्याचे आवाहन करावे असेसुद्धा षन्मुगराजन एस. यावेळी म्हणाले.
कोरोनासंबंद्धित आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी जि.प. च्या नुतन अध्यक्षा वसुमना पंत, मावळते अध्यक्ष मंगेश मोहीते, पोलिस अधिक्षक वसंत परदेशी, निवासी ऊपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, ऊपजिल्हाधिकारी संदिप महाजन, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी अविनाश आहेर, यांच्यासह ईतरही तालुकास्तरीय अधिकारी या बैठकीस ऊपस्थित होती.