मराठी अभिनेत्री मानसी नाईक आपल्या हटके स्टाईल, लुक आणि हॉट अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच मानसी नाईकचा साखरपुडा पार पडला आहे. सोशल मिडियावर तिने तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. मानसी आणि प्रदीप मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी साखरपुडा केला आहे. लवकरचं ते विवाह बंधनात अडकतील.
मानसीने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत कॅपशनमध्ये ‘Engaged. Future Mrs Kharera’ असे लिहले आहे. या फोटोमध्ये मानसी आणि प्रदीप दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंना 27 हजारपेक्षा जास्त लाईक्स भेटले आहेत. मानसीचा होणारा नवरा प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबत अभिनेता आणि मॉडेल सुद्धा आहे. या दोघांचा मुंबईत काल साखरपुडा झाला. मानसीने लाईट ऑरेंज रंगाची साडी आणि ग्रीन रंगाची साडी घातली होती. प्रदीपने प्रिंटेड शर्ट आणि कुर्ता पजामा घातला होता.
कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला. मानसीचे कुटुंबीय आणि तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री दिपाली सय्यद यावेळी उपस्थित होते. प्रदीपचे कुटुंबीय आणि नातेवाईक हरियाणाला राहतात. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल द्वारे कार्यक्रमाचा आनंद घेतला. मानसी सांगते की, महाराष्ट्रीयन पद्धतीने साखरपुडा आणि त्यांच्या पद्धतीने रोका अशा दोन्ही पद्धती केला.